स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती प्रित्यर्थ बालनाट्य लेखन स्पर्धा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी सतत प्रयत्नशील आहे. बालकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधून ते संपन्न करण्याच्या दृष्टीने बालरंगभूमी महत्वपूर्ण ठरते. बाल रंगभूमीस उत्तम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि लहान वयाच्या कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावी काळात त्यांच्यामधील उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते
महोत्सवात प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | 30-10-2022 |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | |
महोत्सवाची सुरुवात दिनांक | : | 2022-10-30 |
महोत्सवाची समाप्त दिनांक | : | 2022-10-30 |
प्रवेश शुल्क | : | 100 |
तिकीट दर | : |
1.संहिता मराठी भाषेत व नवीन असावी. तिचे सादरीकरण कुठेही झालेले नसावे.
2. संहितेच्या सादरीकरणाचा कालावधी 40 ते 60 मिनिटांपेक्षा जास्त असू नये (उदाहरणार्थ 20 ते 25 पाने)
3. सहभागी स्पर्धकांच्या संहितेच्या प्रकाशनाचे सर्वाधिकार बालरंगभूमी परिषद, नागपूर यांच्याकडे राखीव असतील. त्यासाठी सुरुवातीलाच लेखी सहमती लेखकाला द्यावी लागेल.
4. संहितेचा विषय हा पूर्णपणे बालकांच्या भावविश्वाशी निगडित असावा.
5. स्वतंत्र लेखनाचा विचार करण्यात येईल. थोडक्यात भाषांतरित आणि अनुवादित नाट्यसंहिता मान्य करण्यात येणार नाही. प्रकाशित एकांकिका देखील या स्पर्धेसाठी अपात्र आहेत.
6. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. 100 ठरवण्यात आलेले असून ज्या संहिताना स्पर्धेमध्ये लेखनाचे पुरस्कार मिळालेले आहे ज्या बालनाट्यांना याआधी लेखनाचे पुरस्कार मिळालेले आहे त्यांच्या संहिता स्वीकारल्या जाणार नाही
( A/C :- Balrangbhumi Parisha , IDBI BANK Account No :- 0663104000121934 , IFSC IBKL0000663 )
7. अर्ज आणि संहिता ईमेल किंवा पोस्टाने आपण बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या पत्त्यावर पाठवू शकता. संहिता पाठवण्यासाठी पत्ता “रंगभूमी “ 37,अयोध्या नगर, तिरुपती ज्वेलर्स जवळ, नागपूर
संपर्क क्रमांक 1 | : | वैदेही चवरे सोईतकर : 8055050709 |
संपर्क क्रमांक 2 | : | संजय रहाटे : 9960744484 |
स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती प्रित्यर्थ बालनाट्य लेखन स्पर्धा
- Nagpur, Maharashtra
- वैदेही चवरे सोईतकर : 8055050709
- संजय रहाटे : 9960744484
- balrangbhumiparishad.mh31@gmail.com
- Claim Now
- Tags
#Nagpur Balnatya Lekhan Spardha