एकांकिका.कॉम वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे.

एकांकिका.कॉम हि वेबसाइट आगामी येणाऱ्या सर्व एकांकिका स्पर्धा, एकांकिका संहिता, नाटक, राज्यनाट्य स्पर्धा आणि अभिनयाशी संबंधित सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी बनवली गेली आहे.

आमचा प्रयत्न एवढाच आहे कि जास्तीत जास्त कलाकारांना एकत्र करणे तसेच नवीन पिढीमध्ये अभिनयाची आणि वाचनाची रुची निर्माण करण्याचाच असेल.

२०१६ साली सुरु केलेल्या या वेबसाईट ला अनेक वेगवेगळ्या बदलातून जावं लागलं. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा आमचा नेहमी प्रयत्न आहेच. एका वर्षात सभासद संख्या २५००+ च्या वर गेली. सभासद आणि आयोजक एकांकिका.कॉम या वेबसाईट वर विविध स्पर्धांचे रजिस्ट्रेशन करू लागले आणि या वेबसाईट मधून जास्तीत जास्त स्पर्धकांपर्यंत पोहोचू लागलेत.

एकांकिका.कॉम हि वेबसाईट वाढत्या सभासद संख्येमुळे आणि वाढत्या वापरामुळे खूप वेळा क्रॅश झाली त्यानंतर हि वेबसाईट २ वर्ष बंद करण्यात आली होती. आता हि वेबसाईट पुन्हा नव्याने उभी करण्यात आली आहे. सोबत रंगदेवतेचा आशीर्वाद आहेच फक्त आता तुम्हा लोकांची साथ हवी.

आपल्या काही कल्पना असतील आणि वेबसाईट वर काही बदल करायचे असतील तर आपण आम्हाला संपर्क करून तसे सुचवू शकता.

सोबत आपण अभिनायकल्लोळ.कॉम हि वेबसाईट लवकरच सुरु करणार आहोत


मनोज अत्तरदे : ८८९८११४७३३

एकांकिका स्पर्धा - 564
आयोजक - 74
सदस्य - 2601
लवकरच - 8
लवकरच - 8
आपली जाहिरात इथे करा

आगामी स्पर्धांची माहिती हवी ? आत्ता सभासद व्हा
Created by the Manoj Attarde · © 2022