स्नेहयात्री करंडक
मागील ३ वर्षापासून सतत ही स्पर्धा आम्ही भुसावळ शहरात आयोजित करत आहोत
स्पर्धेबद्दल पारितोषिके :- (एकूण ५०००० रुपयांच्या रोख बक्षीस) १) सांघिक प्रथम :- ११००० रोख + स्मृतिचिन्ह २) सांघिक दुसरं :- ७००० +रोख + स्मृतिचिन्ह ३) सांघिक तिसरं :- ४००० रोख + स्मृतिचिन्ह ४) सांघिक उत्तेजनार्थ :-स्मृतिचिन्ह
प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | 05-03-2023 |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | |
प्राथमिक फेरी समाप्त | : | |
अंतिम फेरी सुरुवात | : | 11-03-2023 |
अंतिम फेरी समाप्त | : | 12-03-2023 |
प्रवेश शुल्क | : | 1500 |
तिकीट दर | : |
१) सदर एकांकिका स्पर्धा शनिवार, ११ मार्च व रविवार १२ मार्च २०२३ या दोन दिवसात श्री कृष्णचंद्र सभागृह, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, केला साईडींग, भुसावळ येथे आयोजित करण्यात येतील. २) सदर स्पर्धेसाठी संघांची संख्या १५ इतकीच मर्यादित आहे. प्रथम प्रवेशांना प्राधान्य दिले जाईल. ३) इच्छुक नाट्यसंस्थांनी आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन रविवार, दि. ५ मार्च २०२३ तारखेला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सबमिट करावेत. ४) सदर स्पर्धेत वयोगटाची कुठलीही अट नसून, स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. ५) एकांकिकेचा कालावधी ३५ ते ४५ मिनिटे इतका असावा. कमी वेळेचे अथवा जास्त वेळेची एकांकिका स्पर्धेतून बाद करण्यात येईल. एकांकिका सादरीकरण आणि पुर्वतयारी यासाठी एकंदरीत ६० मिनिटे इतकाच वेळ दिला जाईल. यापेक्षा जास्त वेळ लागत असल्यास त्या संघाला बाद करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत. ६) आयोजकांतर्फे बॅकड्रॉप, ३+३ विंग्ज, ध्वनीव्यवस्था, ६ स्पॉट, २ जनरल, लाईटासाठी २ स्टॅण्डस, ४ मोडे व ८ लेव्हलस् (४×६फुट साईज व ९ इंची उंचीच्या ) इ. विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जातील. ७) गरजेनुसार लागणाऱ्या इतर सामानांची व्यवस्था नाट्यसंस्थेने स्वत: करावयाची आहे. उपलब्ध विनामूल्य ६ स्पॉट लाईटांच्या व्यतिरिक्त ६ स्पॉट लाईटांची सुविधा आयोजकांतर्फे २०० रु. प्रति स्पॉट याप्रमाणे आकारणी करुन केली जाईल. ८) प्रवेशिकेसोबत रु. १५०० जमा केल्याचा स्क्रीनशॉट अपलोड केल्यावरच प्रवेशिका ग्राह्य धरली जाईल. ९) सोबतच्या प्रवेश अर्जात संस्थेने आपल्या नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकारांची संपूर्ण नावे, वय व ते करीत असलेल्या भूमिकांच्या उल्लेखांसहित पाठवावीत. नाटकाच्या दिग्दर्शनाची तसेच नेपथ्य, ध्वनी व प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा इत्यादींची जबाबदारी उचलणाऱ्या व्यक्तींचीही नावे पाठवावीत. नंतर त्यात काही बदल झाल्यास सुधारीत नावे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर पाठवावीत. संस्थेने पाठवलेल्या तंत्रज्ञ आणि कलावंतांच्या संख्येनुसारच सहभाग प्रमाणपत्र दिले जातील. वेळेवर प्रमाणपत्रांची संख्या कुठल्याही सबबीवर वाढवून मिळणार नाही. १०) प्रकाश योजना करीत असलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती प्रकाशयोजना करतांना आढळल्यास ती एकांकिका प्रकाश योजनेच्या पारितोषिकासाठी अपात्र ठरेल त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त एकांकिकेकरीता प्रकाश योजना (प्रत्यक्ष ऑपरेटींग) करणाऱ्या व्यक्तीला बक्षीसासाठी अपात्र ठरवण्यात येईल. ११) नाटकाकरीता दिल्या गेलेल्या वेळेच्या 1 तास अगोदर संपुर्ण तयारीनीशी त्या त्या संघाला हजर राहणे बंधनकारक आहे. १२) स्पर्धेचे वेळापत्रक सोमवार, ६ मार्च २०२३ रोजी जाहिर होईल. आयोजकांनी दिलेल्या वेळेतच एकांकिका सादर करावी लागेल, कुठल्याही सबबीवर नियोजित एकांकिकेची वेळ बदलून दिली जाणार नाही. संघाला दिलेल्या नियोजित दिवसाला, नियोजित वेळेवर एकांकिका करणे बंधनकारक असेल. वेळापत्रक जाहिर झाल्यानंतर वेळेत किंवा दिवसात कुठलाही बदल केला जाणार नाही. १३) आयोजिकांनी दिलेल्या वेळेनुसार एकांकिका सुरु होत नसल्यास ती एकांकिका स्पर्धेतून बाद ठरविण्यात येऊन पुढील संघाला संधी दिली जाईल. १४) प्रवेशिकेसोबत प्रवेश फी, लेखकाचे संमतीपत्र, रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे सेन्सॉर प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. सदरची कागदपत्रे अंतिम तारखेच्या आत जमा न केल्यास त्या एकांकिकेला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. १५) एकांकिका सुरु होण्याअगोदर एकांकिकेच्या चार प्रती व सहभागी व कलावंत/तंत्रज्ञ यादिच्या दहा प्रती आयोजकांकडे जमा करणे बंधनकारक राहील. १६) स्पर्धेत परिक्षकांचा निर्णय अंतीम राहिल. परिक्षकांच्या निर्णयाला कुठलेही आव्हान देता येणार नाही. १७) सहभागी संघाची प्रवास/निवास/सामान वाहतूक इ. कुठलीच व्यवस्था आयोजकांतर्फे केली जात नाही. प्रत्येक संघाने स्व:खर्चाने स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ एकांकिका स्पर्धा संपन्न झाल्यानंतर (१२ मार्च २०२३ ) लगेचच एक तासांनी समारंभपूर्वक जाहीर करण्यात येईल. (बक्षीसांची रक्कम रोख स्वरुपात असेल)
क्रमांक 1 | : | विरेंद्र पाटील :- ९२२५१२३१११ |
क्रमांक 2 | : | अजय पाटील :- ९३७०७३४७८३ |
Array
विरेंद्र पाटील
विरेंद्र पाटील :- ९२२५१२३१११
- Bhusaval, Maharashtra
- विरेंद्र पाटील :- ९२२५१२३१११
- अजय पाटील :- ९३७०७३४७८३
- snehyatri@gmail.com
- Claim Now
- Tags
#Snehyatri Karandak
#Bhusawal ekankika spardha