रत्नाकर करंडक एकांकिका स्पर्धा

01-05-2022
(5 Ratings)
Report views : 3307
संस्थेबद्दल माहिती
ओम आर्टस् आयोजित
संकल्पना : भूषण देसाई
स्पर्धेबद्दल माहिती

ओम आर्टस् आयोजित - रत्नाकर करंडक २०२२
महाराष्ट्र राज्य व गोवा - रत्नाकर करंडक २०२२
रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून मराठीतील दिग्गज लेखकांच्या साहित्यावर आधारित नवीन एकांकिका सादर व्हाव्यात हा मानस आहे. दरवर्षी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित अशी हि एकांकिका स्पर्धा होईल
स्पर्धेच्या पहिल्या वर्षी मराठी वाचकांचे लाडके लेखक रत्नाकर मतकरी यांच्या साहित्यावर आधारित अशी एकांकिका स्पर्धा सादर करीत आहोत ज्यात स्पर्धक रत्नाकर मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या , कविता, ललित लेख इत्यादी अनेक साहित्य प्रकारांपैकी कोणत्याही साहित्यप्रकाराचा आधार घेऊन एकांकिका सादरीकरण करू शकतात.
सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी "पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी (चिपळूण - कणकवली कोंकण साठी ) - कोल्हापूर (सांगली साठी), नागपूर (विदर्भ साठी ), औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर आणि गोवा " अशा एकूण अकरा केंद्रावर घेणयात येईल
प्रत्येक केंद्रावर जास्तीत जास्त १० संघाना प्रवेश दिला जाईल त्यातून २ एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील

स्पर्धेबद्दल पारितोषिके

प्रथम पारितोषिक रुपये १,००,०००
द्वितीय पारितोषिक रुपये ७५,०००
तृतीय पारितोषीक रुपये ५०,०००
प्रेषक पसंती / विशेष लक्षवेशी एकांकिकेस रुपये २५,००० चे विशेष पारितोषिक
सोबत अन्य वैयत्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत

स्पर्धेची दिनांक आणि वेळ

प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक :07-05-2022
प्राथमिक फेरी सुरुवात:01-06-2022
प्राथमिक फेरी समाप्त:20-06-2022
अंतिम फेरी सुरुवात:26-06-2022
अंतिम फेरी समाप्त :30-06-2022
प्रवेश शुल्क : 3000
तिकीट दर :

स्पर्धेचे नियम व अटी

१. सादर एकांकिका स्पर्धा गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील, सर्व वयोगटातील, रंगकर्मींचा खुली असून महाराष्ट्राचे लाडके लेखक रत्नाकर मतकरी यांच्या साहित्यावर आधारित मराठी एकांकिकांची खुली स्पर्धा - प्राथमिक फेरी तालीम स्वरूपातील व अंतिम फेरी साग्रसंगीत स्वरूपात अशी घेण्यात येईल.

२. रत्नाकर मतकरी यांच्या कथा, नाटके, एकांकिका, कादंबऱ्या, कविता, ललित लेख इत्यादी आणिक साहित्य प्रकारांपैकी कोणत्याही साहित्यप्रकाराचा आधार घेऊन एकांकिकेचे सादरीकरण करावे.

३. अशा आधारित एकांकिकेचा या स्पर्धेतील प्रयोग हा स्पर्धक संघाचा पहिलाच प्रयोग असावा.

४. जी नवीन एकांकिका तयात केली जाईल त्या एकांकिकेची मूळ कथा / मूळ संकल्पना / लेखक म्हणून रत्नाकर मतकरी यांचेच नाव द्यावे लागेल . सादर एकांकिकेकेच्या कुठल्याही आणि कोणत्याही स्वरूपातील सादरीकरणासाठी प्रत्येक प्रयोगासाठी श्रीमती प्रतिभा मतकरी यांची परवानगी आवश्यक राहील.

५. प्राथमिक फेरीत प्रत्येक केंद्रावर केवळ (जास्तीत जास्त ) दहा संघाना प्रवेश दिला जाईल. प्रथम आलेल्या संघाना प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने स्पर्धकांना विनंती आहे कि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा .

६. स्पर्धक'संघाने सोबत जोडलेला फॉर्म पूर्णपणे भरून दिलेल्या ई-मेल वर सादर करणे आवश्यक आहे .

७. स्पर्धेची फी ९९६०३००९६६ - भूषण देसाई यांच्या नंबर वर गुगल पे करावी

८. प्राथमिक फेरीत प्रवेश नक्की झालेल्या संघाचा एक व्हाट्सअँप ग्रुप बनवला जाईल आणि स्पर्धेबाबत च्या सगळ्या सूचना त्या ग्रोउपवर देण्यात येतील त्या सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे.

९. प्रवेश निश्चित झालेल्या स्पर्धक संघाने, आपण निवडलेली कथा. कादंबरी, ललित व अन्य साहित्य ज्याच्यावर आपली एकांकिका आधारित असेल याबाबतचा तपशील आयोजकांना दिनांक २० मे २०२२ ते २५ मे २०२२ पर्यंत कळवणे बंधनकारक राहील. सोबत प्रतिभा मतकरी यांच्याकडून लेखी परवानगी घेणे, अनिवार्य आहे

१०. सादर विषय प्राथमिक फेरीच्या परीक्षकांना देण्यात येईल आणि त्यानुसार प्राथमिक फेरीचे प्रतीक्षान केले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

११. प्राथमिक फेरीसाठी येताना दिलेल्या वेळेच्या दीड तास अशी संपूर्ण संघ उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच सोबत पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील संहिता, पात्र परिचय, दिग्दर्शकाचे अनोगत आणि नेपथ्य आराखडा या सर्वांच्या ३ प्रति आणणे अनिवार्य आहे.

१२. प्राथमिक फेरी दिलेल्या तारखेलाच होणार आहे

१३. प्राथमिक फेरीत आपली एकांकिका तालीम स्वरूपात सादर करावयाची आहे. प्रत्येक केंद्रावर भाग घेणाऱ्या स्पर्धक संघाच्या संख्येवर अंतिम फेरीत किती संघ निवडले जातील, ते ठरवले जाईल . उदाहरणार्थ : एखाद्या केंद्रात पाच संघ असल्यास त्यापैकी एक संघ अंतिम फेरीसाठी निवडला जाईल. तर प्रेमिक फेरीला पाच पेक्षा जास्त दहा संघांपर्यंत संघ असल्यास प्रत्येक केंद्रावरून दोन एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील . केंद्रामधून अंतिम फेरीत किती संघ निवडले जातील याचा अंतिम निर्णय परीक्षक व आयोजक हे मिळून ठरवतील आणि तो निर्णय सर्व संघाना बंडांकरक असेल

१४. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत न गेलेल्या स्पर्धक संघातून परीक्षकांच्या निकषांप्रमाणे वैयक्तिक व सांघिक विशेष लक्षवेशी पारितोषिके देण्यात येतील. सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

१५. प्राथमिक फेरीत भाग घेतलेले कलावंत अंतिम फेरी करीत कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही

१६. अंतिम फेरी दिलेल्या तारखेपर्यंत पूजेनं येथे बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न होईल

१७. सादर महोत्सवामध्ये कमीत कमी ३० मिनिटे व जास्तीत जास्त ४५ मिनिटे लावधीच्या एकांकिकांना प्रवेश दिला जाईल. तसेच स्पर्धक संस्थांना प्रयोग पूर्वतयारी व सादरीकरण करण्याकरिता एकत्रितपणे मिळून एक तास दहा मिनिटे (७० मिनिटे ) अवधी देण्यात येईल

१८. विशलेष सूचना : आपल्या संघाची रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य,, प्रकाश योजना , पार्श्वसंगीत आणि तांत्रिक बाबींच्या विंगेत तयारीकरिता वेळेचे बंद नसले , तरी नेप्त्या, प्रकाश, संगीत यांच्या रंगमंचावरील जोडणी आणि प्रतीक्षा प्रयोग सादरीकरण या करीत फक्त आणि फक्त १ तास १० मिनिटांचे बंधन असून ते अतिशय काटेकोरपणे पळाले जाईल, याची स्पर्धक संस्थांनी गंभीरपणे नोंद ग्यावी आणि संभाव्य कटुता टाळावी . वेळ न पाळल्यास परीक्षकांच्या व आयोजकांच्या निर्णयानुसार स्पर्धक संघ बॅड होऊ शकेल

१९. सर्व स्पर्धक संघानी त्यांना दिलेल्या तारखेस व दिलेल्या वेळेवर प्राथमिक फेरीसाठी आणि अंतिम फेरीसाठी दीड तास आधी आयोजकांशी प्रतीक्षा संपर्क साधने आवश्यक आहे.

२०. प्राथमिक फेरी - नेपथ्य प्रकाश यांच्याविना -तालीम स्वरूपात घेणयात येईल . अंतिम फेरीसाठी प्रत्येक संस्थेला दोन लेव्हल्स, दोन ठोकळे, दोन दरवाजे चौकटी , ६ स्पॉट ६ डीमर हे साहित्य विनामूल्य पुरवण्यात येईल. याव्यतिरिक्त साहित्याचे विहित शुल्क द्यावे लागेल

२१. अंतिम फेरीसाठी रंगभूषाकार आयोजकांतर्फे विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल . मात्र चार व्यक्तिरेखांच्या सामान्य मेकअप वगळता अधिक पात्रे व दाढी-मिशा विग इत्यादी विशेष बाबींकरिता अतिरिक्त शौलक द्यावे लागेल मेकअप साठी यापेक्षा अधिक काही हवे असल्यास त्याची कल्पना एक आठवडा आधी आयोजकांना देणे आवश्यक

२२. सदर स्पर्धेत कोणत्याही अभिनेता व अभिनेत्री यांना एकापेक्षा अधिक एकांकिकेत अभिनय करता येणार नाही

२३. सदर स्पर्धेच्या निकालाबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, याची नोंद घ्यावी .

विशेष सूचना : प्राथमिक फेरीचा निकाल प्रत्येक केंद्रनिहाय त्याच दिवशी रात्री ऑनलाईन जाहीर करण्यात येईल

संपर्क
क्रमांक 1: भूषण देसाई 9960300966
क्रमांक 2: अनिकेत शहाणे 9320282006
क्रमांक 3: सीमा देसाई नायर 9930999771
आयोजक / संयोजक
भूषण देसाई
अनिकेत शहाणे
event image
आयोजक
भूषण देसाई

ओम आर्टस् आयोजित
संकल्पना : भूषण देसाई

  • Pune, Maharashtra
  • भूषण देसाई 9960300966
  • अनिकेत शहाणे 9320282006
  • सीमा देसाई नायर 9930999771
  • ratnakarkarandak@gmail.com
प्रवेश शुल्क
3000
  • Claim Now
  • Tags
  • #Ratnakar Karandak

    #Pune ekankika spardha

    #Mumbai ekankika spardha

    #Goa ekankika Spardha

Created by the Manoj Attarde · © 2022