अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा
अहमदनगर, ५३० वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेलं शहर. याच अहमदनगर शहरात अहमदनगर महाकरंडक स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १५० हुन अधिक संघ दर्जेदार एकांकिका सादरीकरण करतात. महाकरंडकच्या व्यासपीठावरून अनेक कलाकारांना मोठी संधी प्राप्त होऊन त्यांनी आता टेलिव्हिजन, सिनेमा आणि थिएटरमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.अहमदनगर महाकरंडक या स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. गेली नऊ वर्षे अत्यंत जोशात आणि हर्षोल्हासात हि स्पर्धा संपन्न होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रंगकर्मी प्रयोगशील आणि दर्जेदार एकांकिका येथे सादर करतात. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हि स्पर्धा होऊ शकली नाही. सर्वच रंगकर्मींना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. परंतु यावर्षी असं होणार नाही. रंगकर्मी आणि रंगभूमीची बहुप्रतीक्षित भेट यावर्षी होणार आहे. अहमदनगर महाकरंडक २०२२ – रंगभूमीची रणभूमी “उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा” हा रंगभूमीचा उत्सव येतोय नवरसांचा अविष्कार घेऊन! या नवव्या पर्वात होईल न भुतो न भविष्यती अशी स्पर्धा आणि सोबतीला असेल कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याची सर्वात मोठी संधी. नवरसांनी रंगून जाईल रंगभूमीची रणभूमी. चला तर रंगकर्मींनो, तयार व्हा या रंगभूमीच्या रणसंग्रामासाठी, हि रणभूमी दणाणून सोडण्यासाठी!
वैयक्तिक पारितोषिके दिग्दर्शन प्रथम क्रमांक: ₹ २१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ₹ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक: ₹ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ : ₹ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ : ₹ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अभिनेता/ अभिनेत्री प्रथम क्रमांक: ₹ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ₹ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक: ₹ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ : ₹ ३११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ : ₹ ३११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र सह-अभिनेता/अभिनेत्री: प्रथम क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र विनोदी कलाकार : प्रथम क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रकाश योजना/संगीत/नेपथ्य: प्रथम क्रमांक: ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र रंगभूषा/वेशभूषा: प्रथम क्रमांक: ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक: ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | 0 |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | 2022-04-01 |
प्राथमिक फेरी समाप्त | : | 2022-04-01 |
अंतिम फेरी सुरुवात | : | 2022-04-26 |
अंतिम फेरी समाप्त | : | 2022-04-29 |
प्रवेश शुल्क | : | 1100 |
तिकीट दर | : |
१) एकांकिका स्पर्धा हौशी नाट्यसंस्था आणि महाविद्यालये यांच्यासाठी खुली आहे. २) हि स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अश्या स्वरुपात असुन प्राथमिक फेरीला परीक्षक स्वतः तालीम स्वरूपातील एकांकिका पाहून ती अंतिम फेरी साठी निवडतील. २५ डिसेंबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरी होणार असून प्राथमिक फेरीचे नियोजन स्पर्धा संयोजानाकडून संघाना फोनद्वारे कळवण्यात येईल. तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल. ३) अंतिम फेरी २६ एप्रिल ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान सकाळी १० वाजता माऊली सभागृह, माऊली संकुल, झोपडी कॅन्टीन शेजारी, नगर-मनमाड रोड, अ.नगर येथे होणार असुन त्याचा बक्षीस समारंभ २९ एप्रिल २०२२ लाच करण्यात येईल. ४) स्पर्धेचा प्रवेश अर्ज https://mahakarandak.com/register या संकेतस्थळावर उपलब्ध असून दि. २० डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवेश अर्ज या संकेतस्थळावरच भरावयाचा आहे. (फोनवर अथवा लेखी प्रवेश स्वीकारला जाणार नाही.) ५) प्रवेश शुल्क ₹ १,१०० /- असून ते फक्त ऑनलाइनच स्वीकारले जाईल. प्रवेश शुल्क भरण्यासाठी क्लिक करा - https://mahakarandak.com/. प्रवेश शुल्काशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. ६) एकूण ३३ एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील. ७) प्रत्येक संघास सहभागाचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ८) एकांकिका सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च संघाने स्वतः करावयचा आहे. संयोजकांकडून स्पर्धकसंघाची १ दिवस राहायची आणि भोजनाची सोय केली जाईल. ९) तालीम स्वरूपातील प्राथमिक फेरीच्या दिवशी स्पर्धक संघाने संहितेची टाईप केलेली १ प्रत आणि लेखकाचे परवानगी पत्र, डी.आर.म. पत्र, कलाकारांची आणि तंत्रज्ञांची यादी देणे बंधनकारक आहे. संघात ८ पेक्षा जास्त तंत्रज्ञ असता कामा नये. १०) संयोजकांकडून ८ लाईट स्पॉट,(लाईट्स बारचे डिझाईन संकेत स्थळावर उपलब्ध आहे.) ९” व १५” २ लेव्हल, २ मोडे, २ खुर्ची, २ टेबल निशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. या व्यतिरिक्त लागणारया रंगभूषा/वेशभूषा इ. आणि अश्या सर्व बाबींकरिता सवलतीच्या दरात शुल्क आकारले जाईल. परंतु त्याची माहिती प्राथमिक फेरीलाच देणे गरजेचे आहे. ११) प्राथमिक फेरीला सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय अंतिम फेरीत प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. १२) प्रत्येक स्पर्धक संघास एकांकिका सादर करण्यासाठी एक तासाचा (६० मिनिटे) कालावधी देण्यात येईल. यात रंगमंच मांडणी, प्रकाश योजना, ध्व्नी योजना यांसह एकांकिका सादर करून रंगमंच रिकामा करावयचा आहे. हा नियम अतिशय काटेकोरपणे पाळला जाणार असुन हा नियम न पाळणाऱ्या संघास स्पर्धेतून त्वरित बाद/डिबार करण्यात येईल. १३) आपणास दिलेल्या तारखेस आणि वेळसच एकांकिका सादर करावी लागेल. आपली एकांकिका सुरु होण्याच्या २ तास आधी रिपोर्टिंग करणे गरजेचे आहे. १४) अंतिम फेरीचे लॉटस ९ जानेवारी २०२२ रोजी संघाना फोनद्वारे कळविण्यात येतील, तसेच ते स्पर्धेच्या संकेत स्थळावरही जाहीर करण्यात येईल. १५) कुठल्याही संघाने कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा नियमबाह्य काम केल्यास त्याचा परिणाम निकालावर होईल, तसेच तो संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. १६) लेखनाच्या पारितोषिकासाठी सर्व लेखकांचा विचार केला जाईल, परंतु अनुवादित, भाषांतरित, रुपांतरीत अथवा आधारित संहिता असल्यास तिचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. तसेच अश्या एकांकिका असणाऱ्या संघांनी मुळ लेखकाची/प्रकाशकाची/त्याच्या वारसाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याबाबतची कुठलीही जबाबदारी स्पर्धा संयोजकांकडे नसेल. १७) स्पर्धेच्या वरील सर्व नियमात व कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवलेला असुन नियमांच्या अर्थाबाबत (Interpretation) संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संयोजकाकडे असेल. १८) कोणतेही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर संयोजकांनी ठरविल्यानुसार टॉप 10 नाटक आपले सर्व स्वारस्य आणि कॉपीराइटसह प्रसारण आणि जाहिरातीसाठी संबंधित सर्व अधिकार आयोजकांकडे असतील. १९) टॉप 10 नाटकांचे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारण करण्यास नकार देण्याचा प्रथम अधिकार आयोजकांना असेल.
क्रमांक 1 | : | ७२७६३५५१४८ |
नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा
- अहमदनगर, Maharashtra
- ७२७६३५५१४८
- https://mahakarandak.com/
- info@mahakarandak.com
- Claim Now
- Tags
#अहमदनगर महाकरंडक २०२२
#अहमदनगर महाकरंडक