अद्वैत एकांकिका स्पर्धा
दरवर्षी "अद्वैत " नावाची मराठी नाटक स्पर्धा सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक रुग्णालय आयोजित करत असते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून बर्याच स्पर्धक सहभाग घेतात आणि एकांकिका सादर करतात. डॉ. अमोल कोल्हे यांनी अद्वैतला सुरवात केलेली.
प्राथमिक फेरीच्या तारखा २९, ३० सप्टेंबर आणि १, २, ३ ऑक्टोबर आहेत. अंतिम फेरी ६ ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह, परळ येथे संपन्न होईल.
अनेक दिग्गज कलाकार या सोहोळ्याला आपली उपस्थिती लावणार आहेत.
प्रमुख पाहुण्यांमध्ये आता पर्यंत स्वप्निल जोशी , शिवाजी साटम, भरत जाधव, अंकुश चौधरी, सुप्रिया पिळगावकर तसेच बरेच मोठ्या कलाकारांनी अद्वैत साठी उपस्थिति दिली आहे.
• सर्वोत्कृष्ट एकांंकिका : ₹ ३०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांंकिका : ₹ २०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट तृृतीय एकांंकिका : ₹ १०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : ₹ १५००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : ₹ १०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ₹ १५००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ₹ १०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ₹ १५००/-
• सर्वोत्कृष्ट लेखक : ₹ १५००/-
• सर्वोत्कृष्ट नेपथ्य: ₹ १०००/-
• सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : ₹ १०००/-
• सर्वोत्कृष्ट वेशभूषा: ₹ १०००/-
प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक | : | |
प्राथमिक फेरी सुरुवात | : | 2022-09-29 |
प्राथमिक फेरी समाप्त | : | 2022-10-03 |
अंतिम फेरी सुरुवात | : | 2022-10-06 |
अंतिम फेरी समाप्त | : | 2022-10-06 |
प्रवेश शुल्क | : | 1000 |
तिकीट दर | : |
१. स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन तसेच खुला गट यांच्यात भरविण्यात येईल.
२. दोन्ही गटांमधून एकत्रितपणे अंतिम फेरीसाठी एकांकिका निवडण्यात येईल.
३. स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा फेऱ्यांमध्ये होईल. प्राथमिक फेरीच्या तारखा २९, ३० सप्टेंबर आणि १, २, ३ ऑक्टोबर आहेत. अंतिम फेरी ६ ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह, परळ येथे संपन्न होईल.
➢ प्राथमिक फेरी- C.V.T.C Building, K.E.M Hospital.
➢ अंतिम फेरी - दामोदर नाट्यगृह, परळ.
४. प्रवेश फी ₹ १०००/- आहे.
५. प्रवेश पत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२२ आहे.
६. प्रवेश पत्रिका प्रवेश फी, एकांकिकेच्या २ प्रति, लेखकांची परवानगी, रंगभूमी परीनिरीक्षक मंडळाचे(सेन्सर बोर्ड) चे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे.
७. एकांकिका सादरीकरणासाठी व नेपथ्य बदलासाठी १ तासाचा अवधी दिला जाईल, निर्धारित वेळेत सादर न होऊ शकलेल्या एकांकिकाचे
गुुण कमी करण्यात येतील.
८. लॉटरी पद्धतीनुसार सदारीकरणाचे क्रमांक ठरविले जातील, यामध्ये बदल केले जाणार नाही.
• ८ अ. २७ सप्टेंबर रोजी सादरीकरणाचे क्रमांक ठरविले जातील, तर त्या दिवशी गटप्रतिनिधींद्वारा चिट्ठी उचलून क्रम ठरविला जाईल
• ८ ब. गैरहजर संघाच्यावतीने चिट्ठी उचलून क्रम त्यांचा ठरविला जाईल
• ८ क. ३ ऑक्टोबर रोजी शेवटची एकांकिका झाल्यानंतर १ तासाचा ब्रेक होईल त्यानंंतर परीक्षक निकाल जाहीर करतील त्यानंतर अंतिम फेरीसाठी चे क्रमांक लॉटरी पद्धतीनुसार ठरववले जातील. त्यासाठी संबंधित संघप्रतिनिधींनी उपस्थित असणे आवश्यक आहे
(Google meet, Zoom, इ. माध्यमांचा उपयोग केला जाणार नाही)
• ८ ड. कोणत्याही प्रकारचे मतभेद झाल्यास त्यावरती अंंतिम निर्णय घेण्याचा हक्क व्यवस्थापनाचा असेल.
९. अंंतिम फेरीसाठी दामोदर नाट्यगृह, परळ तर्फे २ स्पॉट, २ हॅलोजन्स्, १ पोडीयम, २ खुर्च्या, २ प्लॅटफॉर्म्स, मायक्रोफोन तसेच सर्वसाधारण लाईट, इत्यादी साहित्य दिले जाईल, यापेक्षा अधिक साहित्य हवे असल्यास स्पर्धकाने दामोदर नाट्यगृह, परळ
वगवस्थापनाकडे परस्पर संपर्क साधावा व त्यांच्याकडे योग्य तो आकर भरावा (संपर्क : श्री. राजन ९८६९१२५३०२) (प्रकाश योजना श्री.
सुभाष : ९८६९४६३१७४ / ९२२०८३०९९९)
१०. प्राथमिक फेरी कोणत्याही तांत्रिक सहकार्याशिवाय (उदा.नेपथ्य, प्रकाश, वेशभूषा, रुंगभूषा, इ.) सादर करावी. अंंतिम फेरीसाठी आवश्यक तांत्रिकबाबींची व्यवस्था स्पर्धकाने स्वतः करावी.
११. ठरलेल्या वेळेत जर एखादा संघ सादरीकरणासाठी उपस्थित राहिला नाही तर तो स्पर्धेतून बाद ठरवला जाईल. ऐनवेळी वेळ बदलून देण्यासाठी आयोजकांना त्रास देऊ नये. संघानी आपल्या एकांकिका सादरीकरणाच्या वेळेच्या किमान एक तास आधी हजर राहणे
बंधनकारक आहे.
१२. सदर स्पर्धा ही सांस्कृतिक उपक्रमाचा एक भाग आहे. त्यामुळे आनंदी व खेळीमेळीच्या शिस्तपुर्ण वातावरणामध्ये एकांकिका संपन्न व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.
१३. परीक्षणासाठी सादरी करण्याची वेळ, अभिनय, निर्मिती, गुुणवत्ता यास प्राधान्य दिले जाईल. गुुणवत्तापत्रक तयार करण्याचा अधिकार परीक्षण मंडळास राहील.
१४. आवश्यकतेनुसार कार्यक्रमात बदल करण्याचा आयोजकांचा अधिकार राखीव राहील.
१५. अंतिम फेरीतील विजेत्यांसाठी पारितोषिक योजना पुढील प्रमाणे:
• सर्वोत्कृष्ट एकांंकिका : ₹ ३०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांंकिका : ₹ २०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट तृृतीय एकांंकिका : ₹ १०,०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट अभिनेता : ₹ १५००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : ₹ १०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ₹ १५००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : ₹ १०००/- आणि चषक
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ₹ १५००/-
• सर्वोत्कृष्ट लेखक : ₹ १५००/-
• सर्वोत्कृष्ट नेपथ्य: ₹ १०००/-
• सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : ₹ १०००/-
• सर्वोत्कृष्ट वेशभूषा: ₹ १०००/-
(पारितोषिकांची रक्कम अंंतिम फेरीनंंतर ३ महिन्यांमध्ये चेक स्वरूपात मिळेल)
क्रमांक 1 | : | अंजली कांंबळे : ८४८३८७१६०५ |
क्रमांक 2 | : | तेजस्विनी खानजुडे :९०२१४०७९८२ |
क्रमांक 3 | : | आरूषी राजपूत : ८०१०२३७३५२ |
क्रमांक 4 | : | ऋषीकेश कानडे : ९५८८६४६५०८ |
क्रमांक 5 | : | जान्हवी लाड : ९३२५३१४५२१ |
आयुष आकोत
सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक रुग्णालय
- Parel, Maharashtra
- अंजली कांंबळे : ८४८३८७१६०५
- तेजस्विनी खानजुडे :९०२१४०७९८२
- आरूषी राजपूत : ८०१०२३७३५२
- ऋषीकेश कानडे : ९५८८६४६५०८
- जान्हवी लाड : ९३२५३१४५२१
- Claim Now
- Tags
#Advait ekankika